हा लेख इंग्रजीत वाचा: HARI HARAYE NAMAḤ KṚṢṆA
नाम-सङ्कीर्तन नरोत्तम दास Ṭहाकुर रचित; श्री बबजि अनुवादित
(१)
हरि हरये नमः कृष्ण यादवाय नमः यादवाय माधवाय केशवाय नमः
हे हरि, तुम्हाला माझा नमस्कार! हे कृष्ण, यदुवंशात जन्मलेल्या तुम्हाला माझा नमस्कार. यादव, माधव आणि केशव या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णांना माझा नमस्कार.
(२)
गोपाल गोविन्द राम श्री-मधुसूदन गिरिधारी गोपीनाथ मदन-मोहन
हे गोपाल, गोविन्द, राम, श्री मधुसूदन, गिरिधारी, गोपीनाथ आणि मदन-मोहन!
(३)
श्री-चैतन्य-नित्यानन्द श्री-अद्वैत-सीता हरि गुरु वैष्णव भागवत गीता
श्री चैतन्य आणि नित्यानन्द, श्री अद्वैत आणि सीता यांचा जयजयकार असो. हरि, गुरू, वैष्णव, श्रीमद् भागवत, आणि भगवद् गीता चा जयजयकार असो.
(४)
श्री-रूप सनातन भट्ट-रघुनाथ श्री-जीव गोपाल-भट्ट दास-रघुनाथ
श्री रूप, सनातन, रघुनाथ भट्ट, श्री जीव, गोपाल भट्ट आणि दास रघुनाथ यांचा जयजयकार असो.
(५)
एइ छय गोसाईर करि चरण वन्दन याहा होइते विघ्न-नाश अभीष्ट-पूरण
मी या सहा गोस्वामींच्या चरणी नमस्कार करतो. त्यांना नमस्कार केल्याने भक्तीतील सर्व विघ्ने नष्ट होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
(६)
एइ छय गोसाइ यार मुइ तार दास ता-सबार पद-रेणु मोर पञ्च-ग्रास
जो या सहा गोस्वामींची सेवा करतो, मी त्याचा दास आहे. त्यांच्या चरणकमलांची धूळ हेच माझे पाच प्रकारचे अन्न आहे.
(७)
तांदेर चरण-सेवि-भक्त-सने वास जनमे जनमे होय एइ अभिलाष
जन्मोजन्मी मी या सहा गोस्वामींच्या चरणकमलांची सेवा करणाऱ्या भक्तांसोबत राहावे!
(८)
एइ छय गोसाइ यबे व्रजे कैला वास राधा-कृष्ण-नित्य-लीला करिला प्रकाश
हे सहा गोस्वामी व्रज मध्ये राहिले तेव्हा त्यांनी राधा आणि कृष्ण यांनी आपल्या नित्य लीला केलेली स्थाने प्रकट केली.
(९)
आनन्दे बोलो हरि भज वृन्दावन श्री-गुरु-वैष्णव-पदे मजाइया मन
आनंदाने हरि नामाचा जप करा आणि वृन्दावनाचे भजन करा. श्री गुरु आणि वैष्णवांच्या चरणी मन लावा.
(१०)
श्री-गुरु-वैष्णव-पद-पद्म करि आश नाम-सङ्कीर्तन कहे नरोत्तम दास
श्री गुरु आणि वैष्णवांच्या चरणकमलांच्या सेवेची आशा धरून नरोत्तम दास श्री हरींच्या पवित्र नामांचे हे सङ्कीर्तन गातात.